।। आवडते अभंग ।।
गजर - माऊलीचा

सादरकर्ते - ह. भ. प. बाबा महाराज सातारकर
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
गजर - माऊलीचा

सादरकर्ते - ह. भ. प. बाबा महाराज सातारकर
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
देवाचिये व्दारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । व्दारकेचा राणा पांडवा घरी ॥

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥

अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
सादरकर्ते - आनंद भाटे आणि राहूल देशपांडे
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ।।
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे होउनी निःसंग ।।
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग ।।
ब्रम्हानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ।।
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ।।
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे होउनी निःसंग ।।
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग ।।
ब्रम्हानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ।।
पंढरीची वारी। आहे माझे घरीं।
आणिक न करी । तीर्थ व्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतींचे तुका म्हणॆ ॥३॥
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणे राखिला दारवंटा ।
केला भोगवटा आम्हा लागी ॥२॥
वंश परंपरा दास मी अंकिता ।
तुका मोकलिता लाज कोणा ॥३॥
- संत तुकाराम

झाले समाधान, तुमचे देखिले चरण ।।१।।
आता उठावेसे मना, येत नाही नारायणा ।।२।।
सूरवाडीकपणे, येथे सापडले केणे ।।३।।
तुका म्हणे भोग, गेला निवारला लाग ।।४।।

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकला हरिच्या दासा ।। १।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संत मंडळी सुखी असो ।। २।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।। ३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निधान पांडुरंग ।। ४।।

कृपाळु हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत ||
पंढरीसी जाऊ चला, भेटु रखुमाई विठ्ठला ||
पुंडलीके बरवे केले, कैसे भक्तिने गोविले ||
एका जनार्दनी नीट, पायी जोडीले सेवेत ||

मागणे हे एक तुजप्रती आहे । देशील तरी पाहे पांडुरंगा ।।१।।
या संतांसी निरवी हेंचि मज देई । आणिक दुजे काही न मागे देवा ।।२।।
तुका म्हणे आता उदार तू होई । मज ठेवी पायी संतांचिया ।।३।।

हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ।।१।।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरि ।।२।।
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा सुकाळ ।।३।।
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ।।४।।

JAY JAY RAM KRISHNA HARI.
उत्तर द्याहटवाALABHYA LABH.
JAY HARI MAULI....
सुंदर संग्रह
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आहे शुभेच्छा 🙏 अभिनंदन
उत्तर द्याहटवा