श्री गणपतीची आरती
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची ||१||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती ||धृ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटि कुमकुम केशरा |
हीरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया ||२||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती ||धृ||
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना |
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सादना |
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुखरवंदना ||३||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती ||धृ||
श्री शंकराची आरती
लवधवती विक्राळा
ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥१॥
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥१॥
जय देव जय देव
जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥धृ॥
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥धृ॥
कर्पूरगौरा भोळा
नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥जय॥२॥
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥जय॥२॥
देवीं दैत्यीं
सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥जय॥३॥
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥जय॥३॥
व्याघ्रांबर
फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥जय॥४॥
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥जय॥४॥
श्री भीमाशंकराची आरती
आरती भीमाशंकरा।
ज्योतिर्लिंग परस्परा।
ओवाळीतो कर्पूर
शिवगौरा॥१॥ भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
भक्ता सोडूनी
बहु दूरा। मंदीर तुझे दरीखोरा।
सत्व पाहशी खरोखरा॥२॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
भीमा निघुनी
तुझे चरणी। पावन करिसी सर्व धरणी।
करणी आहे तुझी
न्यारी॥३॥ भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
गगना भेदा तुझे
शिखरा। पाहता पाप ताप पहारा।
सन्मुखा उभा
नंदिश्वरा॥४॥ भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
ऐका आरती करितो
राया। शोक नाशक शिवराया।
भाकिती शंभू
गौरीवरा॥५॥ भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
पंचारति करितो
राया। पंचमुखी शंभूराया।
पंच तत्व निर्विकारा॥६॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
भू कैलास खरोखरा।
कमलजा देवी अवतारा।
करितो प्रभू
नमस्कार॥७॥ भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥
श्री विठ्ठलाची आरती
युगे अटावीस विटेवरी उभा
वामांगीं रखुमाई
दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी
परब्रह्म आले गा ||
चरणीं वाहे भीमा
उद्धरी जगा ||१||
जय देव जय देव
जय पांडुरंगा |
रखुमाईवल्लभा
राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||
जय देव जय देव ||धृ||
तुळसीमाला गलान
कर ठेवुनि कटीं |
कासें पीतांबर कस्तुरी
लल्लाटीं ||
देव सुरवर नित्य
येती भेटी |
गरुड हनुमंत
पुढें उभे राहती ||२||
धन्य वेणूनाद
अनुक्षेत्रपाला |
सुवर्णांची कमळ वनमाला
गलां ||
राही-रखुमाबाई
राणीया सकळ ||
ओंवोलिती राजा
विठोभा सांवला ||३||
ओंवालूं आरत्या
कुर्वंडया येती ||
चंद्रभागेमाजीं
सोडुनियां देती ||
दिडया पताका
वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा
वर्णावा किती ||४||
आषाढ़ी कार्तिकी
भक्त्जन येती |
चंद्रभागेमाजीं
स्नानें जे करिती |
दर्शनहेलामात्रें तयां
होय मुकती |
केशवासी नामदेव
भवें ओवालिती ||५||
श्री विठ्ठलाची आरती २
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥धृ॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई हो ॥१॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई हो ॥२॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो ॥३॥
श्री रामचंद्रांची आरती
उत्कट
साधृनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह
लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक
राक्षस मर्दूनी ।
देह
अहंभाव रावण निवटोनी ।।१।।
जय
देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे
आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।।धृ।।
प्रथम
सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका
दहन करुनी अखया मारिला ।
मारिला
जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची
गुढी घेऊनिया आला ।।२।।
निजबळे
निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी
येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे
ओसंडे वैराग्य भरता ।
आरती
घेऊनी आली कौसल्यामाता ।।३।।
अनाहतध्वनि
गर्जती अपार ।
अठरा
पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी
आले दशरथकुमार ।
नगरीं
होत आहे आनंद थोर ।।४।।
सहजसिंहासनी
राजा रघुवीर ।
सोऽहंभावे
तया पूजा उपचार ।
सहजांची
आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास
स्वामी आठव ना विसर ।।५।।
श्री मारुतीची आरती
सत्राणें
उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥धृ०॥
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥धृ०॥
दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव॥२॥
श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक
त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्दें नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्दें नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरति ओंवाळीतां हरली भवचिंता ॥धृ॥
सबाह्य-अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥
पराहि परतली तेथें कैंचा हा हेत ।
जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय॥२॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगें प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मरमरणाचा फेरा चुकवीला ॥ जय॥३॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनी श्रीदतध्यान ॥ जय देव ॥४॥
श्री दत्ताची आरती २
धन्य
हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा
महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो
पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
मृदंगताघोषी
भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या
हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा
करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥
श्री भैरवनाथाची आरती
जय
देव जय देव जय भैरवनाथा ।
सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ ध्रु० ॥
सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ ध्रु० ॥
भैरवनाथा
गौरव दे मज भजनाचें ।
रौरव संकट नाशी जनना- निधनाचें ॥
निशिदिनिं देवा दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरवपदनखचंद्रीं करिं मन मम साचें ॥ जय० ॥ १ ॥
रौरव संकट नाशी जनना- निधनाचें ॥
निशिदिनिं देवा दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरवपदनखचंद्रीं करिं मन मम साचें ॥ जय० ॥ १ ॥
भवभयभंजन
सज्ज्नरंजन गुरुदेवा ।
पदरजअंजन लेतां प्रगटे निज ठेवा ॥
जेव्हां दर्शन देसी भाग्योदय तेव्हां ।
अनंत पुण्यें लाधे आम्हां तव सेवा ॥ जय० ॥ २ ॥
पदरजअंजन लेतां प्रगटे निज ठेवा ॥
जेव्हां दर्शन देसी भाग्योदय तेव्हां ।
अनंत पुण्यें लाधे आम्हां तव सेवा ॥ जय० ॥ २ ॥
कलिमलशमना
दानवदमना दे पाणी ।
डमरूरव अमरांते निर्भय सुखदानी ।
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं ।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकिं मनकर्णी ॥ झय० ॥३ ॥
डमरूरव अमरांते निर्भय सुखदानी ।
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं ।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकिं मनकर्णी ॥ झय० ॥३ ॥
लक्षीं
करुणाचक्षी अनुचर निजपक्षी ।
भक्षीं दुष्टां सुष्टां संरक्षीं ॥
साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षीं ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥ जय० ॥ ४ ॥
भक्षीं दुष्टां सुष्टां संरक्षीं ॥
साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षीं ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥ जय० ॥ ४ ॥
सोनारीं
पुरधामीं भैरव कुळस्वामी ।
स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामीं ॥
इच्छित देसी दासां जो जो जें कामी ।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥ ५ ॥
स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामीं ॥
इच्छित देसी दासां जो जो जें कामी ।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥ ५ ॥
श्री
जोतिबाची आरती
भागिरथी
मूळशीतल हिमाचलवासी ।
न लगत
पल खल-दुर्जन संहारी त्यासी ।
तो
हा हिमकेदार करवीरापाशी |
रत्नागिरीवर
शोभे कैवल्यराशी ।।१।।
जय
देव जय देव जयजय केदारा ।
दासा
संकटी तारा भवभय निवारा ।।धृ।।
उत्तरेचा
देव दक्षिणी आला ।
दक्षिण-केदार
नामे पावला ।
रत्नासूर
मर्दोन भक्त पावला ।
दास
म्हणे थोर भाग्ये लाभला ।।२।।
जय
देव जय देव जयजय केदारा ।
दासा
संकटी तारा भवभय निवारा ।।धृ।।
श्री दुर्गा देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।।१।।
जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।।धृ०।।
त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।।२।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।३।।
श्री तुळशीची आरती
जय देवी जय देवी माय तुळसी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी।।धृ.।।
ब्रह्मा केलवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी।।जय.।।१।।
शीतळ छाया भूतळव्यापक तू कैसी।
मंजिरिची बहुआवड कमळारमणासी।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ।।जय.।।२।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी।
गोसावी सुत विनवी मजला तू तारी।।जय देवी.।।३।।
श्री महालक्ष्मीची आरती
धन्य कटिस्थान तेथेची वसती |
पूर्वांडःमुख देवालय आत बरवी मूर्ती |
विष्णूची प्रिया सन्मुख गणपती |
विक्रम शके ब्रम्हा समीप मारूती ||१||
जयदेवी जयदेवी जयमहालक्ष्मी |
चिंतन करितों तुझे अंतर्यामी जयदेवी जयदेवी ||धृ||
कोल्हापुर मूळपीठ तेथेची प्रतिमा |
कटिस्थानी पहा अगाध महिमा |
दुरून भक्त येती पायाशी पदना |
नाना उतसव करिती सांडुनिया कर्मा ||२||
दक्षिण अंगी शंभो हरि शिव गळा |
द्वारी त्रिगुणात्मक सुंदर दीपमाळा |
शेषवाहन शोभे अंबेच्या गळा |
मारिले दैत्य न भी कळीकाळा ||३||
अष्टक्रोशी दूर करमाड नगर |
तेथेचा विप्र हरि शिव शंकर |
अर्पण केली आरती मती कैची फार |
अनाथ नाथे अंबे जोडोनि कर ||४||
श्री करवीर निवासिनीची आरती
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता | पुरहरवरदायिनी
मुरहरप्रियकांता ||
कमलाकारें जठरी जन्मविला धाता | सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ||१||
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ||धृ.||
मातुलिंग गदा खेट्क रविकिरणी | झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ||
माणिकरसना सुरंगवसना म्रुगनयनी | शशिधकरवदना, राजस मदनाची जननी ||२||
तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी | सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ||
गायत्री निजबीजा निगमागम सारी | प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ||३||
अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी | मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ||
वारी मायापटल प्रणमत परीवारीं | हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ||४||
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी | लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ||
पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी | मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ||५||
श्री करवीर निवासिनीची आरती 2
जय जय महालक्ष्मी तू करवीर वासीनी हो |
सरशीर जगदोदभवे दुःख दारिद्रय नाशीनी हो ||धृ.||
भक्त प्रिय कारिणी भोजन पूर्णांमृत धारीणी हो |
दक्षिण हस्ते खड.ग घेउन दान्नव संहारीणी हो|| १||
शशी भास्कर कुंडले शषां कोटी मुख मंडले |
पाडीता खंडले श्रवणी तापत्रे खंडले ||२||
रंकाळे पन्दाळे वारुण तीर्थ प्रति पादके हो |
कृष्ण दयार्णव वरदे भगवत् पद सुखानु वादळे हो ||३||
॥ श्री हरितालिकेची आरती ॥
जय देवी
हरितालिके सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीते
ज्ञानदीपकळिके जय देवी जय देवी ॥ धृ ॥
हर अर्धांगी
वससी जासी यज्ञा माहेरासी ।
तेथे अपमान
पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय ॥ १ ॥
रिघसी हिमाद्रीच्या
पोटी कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपश्चर्या
मोठी आचरसी उठाउठी ॥ जय॥ २॥
तप पंचाग्री
साधने धूम्रपाने अधोवेदने ।
केली बहु
उपोषणे शंभु भ्रताराकारणे ॥ जय ॥ ३ ॥
लीला दाखविती
दृष्टी व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा
वरिसी धूर्जटी मज रक्षावे संकटी ॥ जय ॥ ४ ॥
काय वर्णू
तव गुण अल्पमति नारायण ।
माते दाखवी
चरण चुकवावे जन्ममरण ॥ जय ॥ ५ ॥
जय देवी
हरितालिके सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीते
ज्ञानदीपकळिके जय देवी जय देवी ।।धृ ।।
श्री संत ज्ञानेश्वर आरती
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||
लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी ||
आरती ज्ञानराजा ||१||
कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबरही | साम गायन करी ||
आरती ज्ञानराजा ||२||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें |
रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें ||
आरती ज्ञानराजा ||३||
श्री संत तुकारामांची आरती
आरती
तुकारामा ।
स्वामी
सदगुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ॥धृ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ॥धृ॥
राघवें
सागरांत ।
पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकीं रक्षिले ॥ आरती ॥१॥
पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकीं रक्षिले ॥ आरती ॥१॥
तुकितां
तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणोनि रामेश्वरें ।
चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती॥२॥
ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणोनि रामेश्वरें ।
चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती॥२॥
श्री संत नामदेवांची आरती
जय
जयाजी भक्तरायां | जिवलग नामया |
आरती ओवाळिता | चित्त पालटे काया ||धृ.||
आरती ओवाळिता | चित्त पालटे काया ||धृ.||
जन्मता
पांडुरंगे | जिव्हेवरी लिहिले |
शतकोटी अभंग| प्रमाण कवित्व रचिले || जय जयाजी ||१||
शतकोटी अभंग| प्रमाण कवित्व रचिले || जय जयाजी ||१||
घ्यावया
भक्तिसुख | पांडुरंगे अवतार |
धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय जयाजी ||२||
धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय जयाजी ||२||
प्रत्यक्ष
प्रचीती हे | वाळवंट परिस केला |
हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय जयाजी ||३||
हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय जयाजी ||३||
समाधि
माहाद्वारी श्रीविठ्ठलचरणी |
आरती ओवाळितो | परिसा कर जोडूनी | जय जयाजी ||४||
आरती ओवाळितो | परिसा कर जोडूनी | जय जयाजी ||४||
श्री संत एकनाथाची आरती
आरती
एकनाथा महाराजा समर्था |
त्रिभुवनि
तुचि थोर जगद्गुरु जगन्नाथा ||ध्रु||
एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज |
सन्सार
दु:ख नासे महामन्त्राचे बीज ||१||
एकनाथ नाम घेता सुख वातले चित्ता |
अनन्त
गोपालदासा धनी न पुरे गाता ||२||
श्री दशावताराची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥धृ॥
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती॥१॥
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती॥२॥
पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥आरती॥३॥
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती॥४॥
मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥आरती॥५॥
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥आरती॥६॥
बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥आरती॥७॥
मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया || मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया ||
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया || मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ||
मोरया मोरया चिंतामणी मोरया || मोरया मोरया चिंतामणी मोरया ||
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया || मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ||
मोरया मोरया महागणपती मोरया || मोरया मोरया महागणपती मोरया ||
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया || मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ||
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया || मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ||
मोरया मोरया वरदविनायक मोरया || मोरया मोरया वरदविनायक मोरया ||
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया || मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
भजन
घालीन लोटांगण वंदिन चरण
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगिन अनंत पूजिन
भावे ओवाळिन म्हणे नामा
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्व मम देवदेव
कायेन वाचा मनसेंद्रीयैर्वा
बुद्ध्यात्मना व प्रकृतिस्वभावात
करोनी यद्यत सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्रम भजे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे हरे
कर्पूरगौरं
करुणावतारं संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं
हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ॥
मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि
धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे
साध्या:संति देवा: ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने
। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यंकामेश्वरो
वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय
नम: ।
ॐ स्वस्ति । साम्राज्यं
भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम:
सार्वायुष आंतादापरार्धात् ।
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया
एकराळिती । तदप्येषश्लोकोऽभिगीतो ``मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे। आविक्षितस्यकामप्रेर्विश्वेदेवा:
सभासद'' इति।
॥ॐ एकदंताय विदमहे वक्रतुण्डाय
धीमही तन्नो दंती प्रचोदयात॥
॥ॐ महालक्ष्मीच विद्येय्य विष्णूपत्नीच
धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ॥
सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आता
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची
व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे
तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत
सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे
आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे
जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना
सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये
। विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे
श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा