लग्नाचा बार अन सुखाचा संसार,
तुझ्या माझ्या आयुष्यात आली हिरवीगार बहार.
एकमेकांच्या विश्वासावर जगून सख्या, झालं आपलं मीलन,
खूप सारं प्रेम अन भरगच्च जिव्हाळ्याने तू, सुखी केलेस जीवन.
ना कधी भांडण ना कधी वाद,
तुझ्या माझ्या संसाराला फक्त प्रेमाचा गोड स्वाद.
सुखाच्या संसारात सरत होते दिवस,
सोडून तू गेलास मला अचानक एक दिवस.
आभाळ फाटल्यागत झालं अन घुटमळला माझा श्वास,
तुझवीण सख्या रे आयुष्याचा माझ्या झाला मग ऱ्हास.
कल्पनेपलीकडचा एकांतपणा अन गर्द अंधार,
एकाकी आयुष्याला माझ्या आलीय काटेरी धार.
एकटीच ओढतीये रे संसाराचा मी गाडा,
मन थकल्यासारखं होतंय अन जीव होतो वेडा.
खूप प्रयत्न करतेय,
संसाराच्या गाठोड्यातून आठवणींच्या चिंध्या बाजूला काढण्याचा.
पण, आयुष्यभरासाठी सख्या कोरल्यात तू मनावर,
साधी कल्पनाही करवत नाही आठवणींच्या देशातून परतण्याचा.
लग्नाचा वाढ-दिवस आला कि मन खायला उठतं,
हुंदके देऊन मग स्वतःचीच समझुत काढतं.
आठवणींची गोळाबेरीज करताना शब्द तुझे आठवले,
पिल्लांच्या पंखात बळ येऊ देण्यास स्वच्छंदी त्यांना बनवले.
सोनपऱ्या आपल्या आज मुलांचं कर्तव्य पार पाडतायत,
तुझ्याच विचारांची मोळी त्या स्वतःच्या डोक्यावर वाहतायत.
आईला हसत ठेवण्यासाठी पऱ्या आपल्या झगडतात,
स्वतः मात्र कोपऱ्यात जाऊन मुसू मुसू करतात.
मुलामध्ये तुला पाहून आयुष्याला एक दिशा मिळतेय,
मुलींकडे पाहिलं कि मात्र पुसटशी चिंता मनाला लागतेय.
बाबांचं छत्र हरवल्याची जाणीव मुला-बाळांनाही आहे,
पण ती जागा भरून काढण्याची जबाबदारी आता माझी आहे.
तू दिलेल्या आठवणी अन प्रत्येक क्षणाच्या जाणीवा मनात आहेत,
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या पाऊलखुणाही सोबतीला आहेत.
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा कायम उरात बाळगून आहे,
याच प्रेरणेच्या जोरावर आज उंच भरारी घेत आहे.
शब्द तुला देते सख्या,
अश्रू नाही ढळू देणार, हास्याची लकीर ठेवेन ओठांवर,
मुला-बाळांना खूप प्रेम देईन, अन भर देईन त्यांच्या स्वप्नपूर्तीवर.
अखंड उजळेल अंकुर आपल्या घराण्याचा,
सोनपऱ्यांना मिळवून देईन राजकुमार त्यांच्या स्वप्नांचा.
एकच प्रार्थना करते देवापुढे,
तुझीच सावली दिसू दे मला आपल्या मुलांमध्ये,
जगण्याचं बळ दे मला येऊन स्वप्नांमध्ये.
नेहमी धीर देऊन मला, करून घे साकार स्वप्नांना तुझ्या,
आणि त्याच स्वप्नांचा प्रवास अखंड घडो डोळ्यांना माझ्या.
कविता लिहिलेली,
तारीख: ११/१२/२०१२
स्थळ: INDEC (SAINT-GOBAIN Office), अंधेरी (पूर्व), मुंबई.
aho kiti sunder lihilat, dolyat pani ala vachun, patatch nahiye.
उत्तर द्याहटवाToo Good. keep such blogs writing
उत्तर द्याहटवाKhupach chan lihlai.very very nice.
उत्तर द्याहटवाKhup mast.....i like it.... :)
उत्तर द्याहटवा